dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालन्यात लॉजवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश: न्यू शिवगंगा लॉजवर पोलीसांची कारवाई, आठ आरोपी जेरबंद

जालना : शहरातील बसस्थानक रोडवरील न्यू शिवगंगा लॉज येथे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात आठ पुरूष आरोपींना जेरबंद करण्यात आले असून 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहेत.

जालना : शहरातील बसस्थानक रोडवरील न्यू शिवगंगा लॉज येथे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात आठ पुरूष आरोपींना जेरबंद करण्यात आले असून 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहेत.

जालन्यातील बसस्टँड रोडवरील न्यू शिवगंगा लॉजवर मागील दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. यावरून मंगळवार, 9 डिसेंबर रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस ‍निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने लॉजवर सापळा लावला. यावेळी बनावट ग्राहक पाठवून न्यू शिवगंगा लॉजवर छापा टाकण्यात आला. तपासात लॉज मालक बाहेरून महिलांना बोलावून त्यांच्या मदतीने लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले. या कारवाई दरम्यान लॉजमध्ये 8 पुरूष ग्राहक व 4 पीडित महिला आढळून आल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करून लॉजमालक आरोपी संदीप पांडुरंग राऊत, मॅनेजर बाळासाहेब अंकुश जगताप, निखिल शेषराव हिवाळे, राजू नाना गव्हाड, अनिल वामन हिवाळे, गणेश भाऊसाहेब ओळेकर, शिवाजी भाऊराव ओळेकर, अमोल जगन जंजाळ आदींना पोलीसांनी ताब्यात घेतले. या छाप्यात 1 लाख 1 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोउपनि रवी जोशी, पोहेकॉ कृष्णा देठे, महिला अंमलदार संगिता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड तसेच चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top