dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मलकापूर स्थानकावर मालगाडीचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक खोळंबली 

मलकापूर :  मुंबई कडून  नागपूरच्या दिशेने जात असलेल्या मालगाडीचे दोन डबे अचानक रुळावरून घसरले, ज्यामुळे रेल्वे प्रशासन व पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. सदर घटना ९ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही अनुचित हानी झाली नाही.

        मुंबईकडून नागपूरच्या दिशेने धावणारी मालगाडी मलकापूर स्थानकावर नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान फलाट क्रमांक दोनवर आली असता सदर मालगाडीचे शेवटचे दोन डबे रुळावरून घसरल्याने रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. सदर मालगाडीचे डबे अचानक रूळावरून घसरल्याने 

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि तांत्रिक पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. प्लॅटफॉर्म क्र. २ वर घसरलेले दोन्ही डबे स्पष्टपणे दिसत आले. त्यांना परत मार्गावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे दिसून आले. डबे घसरल्यामुळे काही काळ प्लॅटफॉर्मवरील हालचाल विस्कळीत झाली असून नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या उशिराने सुटणार असल्याचे समजते. परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी सुरू असलेल्या तांत्रिक कामांमुळे रेल्वे वाहतूक काही काळ प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top