भोकरदन : आर्थिक व्यवहारातून तालुक्यातील खडगी गावातील एका 40 वर्षीय महिलेचा एकाने खून केल्याची धक्कादायक घटना शनिवार, 6 डिसेंबर रोजी जवखेडा पवार खडकी रोडवर घडली. दरम्यान आरोपीने महिलेचा मृत्तदेह कपाशीच्या शेतात टाकून तेथून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून काही तासातच आरोपीच्या मुस्क्या आवळल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

उषाबाई भास्कर सदाशिवे (40), रा.खडकी, ता.भोकरदन, जि.जालना असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शरद शिवाजी राऊत असे या घटनेत पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहेत. घटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उषाबाई व आरोपी शरद यांच्या मागील काही दिवसांपुर्वी आर्थिक व्यवहार झाला होता. शनिवारी या पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांमधील भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपी शरद याने उषाबाईचा गळा आवळून कायमचा काटा काढला. या प्रकारानंतर शरदने मृत्तदेह रोडलगत असलेल्या एका कपाशीच्या शेतात फेकून दिला व तेथून पसार झाला. काही वेळाने परिसरातील काहीजणांना कपाशीच्या शेतात महिलेचा मृत्तदेह आढळून आल्याने त्यांनी घटनेची माहिती हसनाबाद पोलीसांनी कळवली. पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृत्तदेह ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीसांनी गुप्तवार्ता व तंत्रज्ञानाच्या सहायाने तपास सुरू केला. शरद यांचा मोबाईल नंबर घेवून त्याचे टॉवर लोकेशन तपासले असता, तो घटनास्थळापासून जवळच असलेल्या जावळीवाडी येथील शेतात असल्याची माहिती समोर येताच तत्काळ पथकाने आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. पोलीसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने खूनाची कबूली दिली. याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपी शरद शिवाजी राऊत, रा. चांदई टेपल, ता.भोकरदन यास अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय अहिरे हे करीत आहे.