खामगावात मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न उधळला: ५० हजारांची रोकड जप्त; तिघे फरार, भरारी पथकाची कारवाई

खामगाव :  शहरातील नगर पालिका निवडणुकीपूर्वी मतदारांना थेट पैसे वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील महेबूब नगर परिसरात मतदानाच्या पुर्वसंध्येला 1 डिसेंबर रोजी दुपारी हा प्रकार समोर आला. आचारसंहिता नोडल अधिकारी बाळासाहेब व्यवहारे आणि तलाठी नागरे यांच्या तीन सदस्यीय भरारी पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल 50 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र, पैसे वाटप करणारे संबंधित तिघे व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाले असून ते अद्याप फरार आहेत.

महेबूब नगरमधील घरकूल परिसरात संशयास्पद हालचाली दिसताच भरारी पथकाने तत्काळ धाव घेतली. एका घराजवळ नागरिकांना रोख रक्कम देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच पथकाने छापा टाकला. घटनास्थळी रोकड सापडली, मात्र आरोपी पसार झाले. निवडणुकीदरम्यान मतदारांना पैसे वाटण्याची ही बेधड़क घटना उघड होताच परिसरात संतापाची लाट पसरली आहे. भरारी पथकाने जप्त केलेली रक्कम पंचनामा करून ताब्यात घेतली असून ती नियमानुसार कोषागारात जमा करण्यात येणार आहे. फरार आरोपी कोणत्या पक्षाशी किंवा उमेदवाराशी संबंधित आहेत का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न हा निवडणुकीतील गंभीर गुन्हा मानला जात असल्याने पोलीस तसेच निवडणूक विभाग या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. खामगाव शहरातील महेबूब नगरात 1 डिसेंबर रोजी दुपारी ही कारवाई केली. अज्ञात आरोपी पसार झाले. जप्त रक्कम कोषागारात जमा केली जाईल. पंचनामा करून पोलिसांना माहिती दिली आहे, असे आचारसंहिता नोडल अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »