भावी पिढ्यांचे भविष्य घडविणारी ही निवडणूक : रविंद्र चव्हाण

वैजापूर :  नगर परिषदेसाठी होत असलेली यंदाची निवडणूक कोणत्याही नगराध्यक्ष पदासाठी किंवा नगरसेवकासाठी होत नसून ती भावी पिढ्यांचे भविष्य घडविणारी असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले. वैजापूर नगर परिषद निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवार, 27 नोव्हेंबर रोजी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

वैजापूर शहरातील पंचायत समिती कार्यालय परिसरातील मैदानात झालेल्या सभेच्या व्यासपीठावर इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खा. डॉ भागवत कराड, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशीं, बाळासाहेब संचेती, अकिल शेख, कल्याण दांगोडे, अविनाश गलांडे, प्रकाश चव्हाण, उल्हास ठोंबरे, पंकज ठोंबरे, कैलास पवार यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांची उपस्थिती होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण पुढे म्हणाले की,  केंद्रात पंतप्रधान मोदींचे सरकार आहे व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीचे सरकार आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता वैजापूर शहराच्या विकासासाठी कशाची गरज आहे, त्या सर्व सुविधा देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल ही योजना प्रत्येकाला नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आणली असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान,  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ दिनेश परदेशीं यांनी शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठीचा १८२ कोटींचा प्रस्ताव शासनाने मंजुर करावा, त्या अंतर्गत जायकवाडी व नारंगी धरणातून पाणी घेण्याचे नियोजन असून हा प्रस्ताव मंजुर करावा, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंग रोड (वळण रस्ता) मंजुर करावा, स्वच्छता व अन्य विकासासाठी निधी द्यावा अशी मागणी केली. मागील पाच वर्षात दोनशे कोटी व पंचवीस वर्षात जवळपास दिड हजार कोटींची विकास कामे केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »