गंगापूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत लग्नसोहळ्यासाठ चाळीसगावकडे जाणारा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर सोबत असलेली 13 वर्षीय मुलगी जखमी झाली. हा अपघात बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी जिकठाण फाटा येथे घडला असल्याची माहिती गंगापूर पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूसिंग सोबकचंद महेर (४५ वर्ष), रा. पेंडापूर, ह.मु. ढोरेगाव, ता.गंगापूर असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर आचल बाबूसिंग महेर (१३ वर्ष) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. अपघातात मयत झालेले बाबूसिंग महेर हे ढोरेगाव येथून लग्नसोहळ्यासाठी मुलगी आचल महेर हिच्यासोबत चाळीसगावकडे दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीयू-०५४१) वर जात होते. जिकठाण फाटा येथे त्यांच्या दुचाकीस भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रक क्रमांक (एमएच-२०-सीटी-०८४३) ने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाबूसिंग महेर व आचल महेर यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बाबूसिंग महेर यांना तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकचालकावर कारवाई करण्याची मागणी केली. या अपघाताची नोंद गंगापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.