परभणी : येथील सय्यद बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स आणि ए.आर. स्टड फार्म आयोजित अश्वचाल, रेवाल चाल स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. या स्पर्धेत बिहार येथील सय्यद फरहान अहमद यांच्या एकता एक्सप्रेस नावाच्या अश्वाने प्रथम क्रमांक मिळवला. तर मध्यप्रदेशातील लोकेश पवार यांच्या उडान या अश्वाने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान हरियाणा येथील बाबा राजुदास यांच्या बादल नावाच्या अश्वाने मिळवला.

परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगरी येथे झालेल्या या स्पर्धेच्या व्यासपीठावर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, आमदार राहुल राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, विजय वरपूडकरकर, बाळासाहेब वरपूडकर, सय्यद अबुबक्कर, सय्यद कादर, सय्यद रजाक, सय्यद शोएब आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना आदी राज्यातील मालक, चालक अश्वासह सहभागी झाले होते. या स्पर्धेत परभणी येथील कामरान खान यांच्या अश्वाने चौथा क्रमांक मिळवला. तर पाचवे बक्षीस उत्तर प्रदेशचे अब्दुल्ला खान यांच्या अश्वाने मिळवला. स्पर्धेतील विजेत्या अश्वमालकांना यावेळी रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले.