dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भोकरदन नगरपालिकेसाठी सहा जणांचे अर्ज दाखल नगराध्यक्षपदासाठी अर्ज मात्र निरंक

भोकरदन :  नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह १० प्रभागांतील २० नगरसेवक पदासाठी येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्या दिवसापासून शुक्रवारपर्यंत, म्हणजेच पाच दिवसांपर्यंत, एकही अर्ज दाखल झाला नव्हता. शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदासाठी सहा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्षपदासाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी दिली.

भोकरदन नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह १० प्रभागांतील २० नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरु झाली असून ती सोमवार, 17 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. शनिवारी प्रभाग 7 अ मधून सुगंधाबाई नारायण सोनी, प्रभाग 8 ब मधून चंद्रकांत किसनराव पगारे,  प्रभाग 10 ब मधून खान महजाद इस्लाम, प्रभाग 2 ब मधून शाह शहेबाज नासेर शाह, प्रभाग 8 अ मधून बेग कुरेशाबी शमीम मिर्झा, प्रभाग 1 ब मधून भूषण बाबूप्रसाद शर्मा या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असून अखेरच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक असून आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने नगराध्यक्षपदासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे ही निवडणूक युती किंवा महाविकास आघाडी न होता सर्वच राजकीय पक्षाकडून स्वबळावर लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top