बुलढाण्यात  खो-खो चे विदर्भस्तरीय ‘अदिती अर्बन’ चषक ; 21 ते 13 नोव्हेंबर दरम्यान रंगणार स्पर्धा : खो-खो असोसिएशनचे आयोजन 

बुलढाणा: जिल्हा खो-खो असोसिएशनच्यावतीने विदर्भस्तरीय ‘अदिती अर्बन’ चषक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन  21 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. विदर्भ खो-खो असोसिएशनचे माजी सचिव स्व. रामदास दरणे तसेच सदानंद काणे, जे. बि. भगत आणि पप्पु खान यांच्या स्मरणार्थ बुलढाणा शहरातील जिजामाता व्यापारी संकुलातील मैदानात ही स्पर्धा पार पडणार आहे, अशी माहिती अदिती अर्बनचे उपाध्यक्ष तथा सदर स्पर्धेचे स्वागताध्यक्ष दिनकरराव चिंचोले यांनी आज 6 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली. 

  विदर्भातील सर्व जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून 11 मुलांचे व 11 मुलींचे संघ असतील. यामध्ये, एकूण 374 खेळाडू सहभागी होणार आहेत. पंच, तांत्त्रिक समिती व निवड समितीचे सदस्य आणि  खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी असे 50 अधिकारी स्पर्धेचेकरिता समीक्षक असतील. प्रथम साखळी व नंतर बाद पध्दतीने होणाऱ्या खो- खो स्पर्धेचा रणसंग्राम सलग तीन दिवस दिवस रात्र असणार आहे. प्राविण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.  यशिवाय, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करीत बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. सहभागी मुलींची भोजनाची व्यवस्था बसस्थानकाजवळील सैनिकी मंगल कार्यालय तर मुलांची व्यवस्था क्रीडा संकुल  येथे करण्यात  येईल.  मुला- मुलींना खो- खो प्रती आवड निर्माण व्हावी, हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे सांगत 21 नोव्हेंबरला उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे सचिव टी. ए. सोर, खो- खो असो.चे प्रा. कैलाश पवार, मनोज व्यवहारे, कैलाश करवंदे, संजय सावंत नीलेश पवार, सागर उबाळे यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »