चिखली : तालुक्यातील सावरगाव डुकरे या शांत गावात ५ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. स्वतःच्या आई-वडिलांची कुर्हाडीने निर्घृण हत्या करून मुलाने स्वतःचेही जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्दैवी घटनेत वडील सुभाष डीगंबर डुकरे (७५), आई लता सुभाष डुकरे (६५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (४२) या तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही सावरगाव डुकरे येथील रहिवासी असल्याने गावात शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आले असून संपूर्ण घराला सील करण्यात आले आहे.

चिखली : तालुक्यातील सावरगाव डुकरे या शांत गावात ५ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. स्वतःच्या आई-वडिलांची कुर्हाडीने निर्घृण हत्या करून मुलाने स्वतःचेही जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्दैवी घटनेत वडील सुभाष डीगंबर डुकरे (७५), आई लता सुभाष डुकरे (६५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (४२) या तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही सावरगाव डुकरे येथील रहिवासी असल्याने गावात शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आले असून संपूर्ण घराला सील करण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा सुरू करून मृतदेहांना चिखली येथील जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलविण्यात आले आहे.या घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक वादामुळे का मानसिक नैराश्यातून हा प्रकार घडला, याबाबत तपास सुरू आहे. गावात मात्र भीतीचे आणि दुःखाचे वातावरण आहे.घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी भेट देऊन तपासाची पाहणी केली.
