मुंबई : असरानी म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते-दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांचे सोमवारी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.

मुंबई : असरानी म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते-दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांचे सोमवारी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.
शोले चित्रपटात ‘अंग्रेजों के जमाने का जेलर’ म्हणून प्रसिध्द झालेले 84 वर्षीय अभिनेते दिवाळीच्या पूर्वसंध्येला कालवश झाले आहे. ते गेले अनेक दिवस आजारी होते पाच दिवसांपूर्वी त्यांच्या कुंटुंबियांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. पण उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला. आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनामुळे हिंदी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्यांचा नावलौकिक होता. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या काही भूमिका तर आजदेखील अजरामर आणि कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.