भोकरदन : शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भोकरदन जवळील नांजा फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संदीप गोविंदराव बकाल वय 31 वर्ष रा. भामखेडा ता. भोकरदन असे मयत तरुणाचे नाव आहे.

दरम्यान सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहिती नुसार की संदीप बकाल हे शुक्रवारी जवळील होंडा शाहीनवर दुपारी भामखेडा कडून भोकरदन कडे आले होते तर काम आटोपून ते सायंकाळी सहा वाजेदारम्यान भोकरदन कडून राजूर च्या दिशेने निघाले असता शहरालगत असलेल्या नांजा पाटी जवळ अपघात होऊन पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे सांगितले जात होते.
अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याचे बोलले जात होते
तर अज्ञात वाहनाने या युवकाला जोरदार धडक दिली.की युवकाच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.असल्याचे चे सांगण्यात येत आहे
तर अपघातानंतर बकाल यांना परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत युवकाचा जीव गेला होता.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून सध्या तरी आकस्मित मृत्यू ची नोंद झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तर संदीप यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे तर संदीप यांच्यावर शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ गावी भाम खेडा येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणारा असल्याचे मित्रांनी सांगितले.