अभिजात भाषा सप्ताह निमित्ताने कविसंमेलन; मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आयोजन

जालना :  अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्ताने जालना येथील यशवंतनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात गुरूवार, 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वा कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

जालना :  अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्ताने जालना येथील यशवंतनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात गुरूवार, 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वा कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

      मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याला 1 वर्ष झाले या निमित्ताने हा सप्ताह विविध साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा केला जात आहे. यास अनुसरून या सप्ताहाचा आज समारोप होत आहे. यानिमित्ताने  मसाप शाखा जालनाच्या वतीने मराठी भाषा अभ्यासक डॉ. जगन्नाथ खंडागळे व प्राचार्य डॉ. आर जे. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी कवींचे कविसंमेलन आयोजित केले आहे. या कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. ज्योती धर्माधिकारी असून सहभागी कवी राम गायकवाड, प्रभाकर शेळके, अशोक पाठक, मारूती घुगे, अशोक डोरले, नारायण खरात, रत्नमाला मोहिते, प्रदीप देशमुख, दिगंबर दाते, विद्या दिवटे, सुनील लोणकर, राजाराम जाधव, मनिष पाटील, श्रीकांत गायकवाड, गणेश खरात, अशोक खेडकर, रेखा गतखणे, दीपक राखुंडे, वैशाली फोके, किशोर भालेराव, शंकर बावणे, जिजा वाघ, कृष्णा आर्दड, स्वाती रत्नपारखे, छाया वाघ, मनिषा गायकवाड, कृष्णा कदम, विनोद काळे, समाधान खाडे आदी कवी आपल्या कविता सादर करणार आहे. निवेदन गझलकार डॉ. राज रणधीर करणार असल्याचे संयोजक प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांनी कळविले असून या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन शाखेचे अध्यक्ष रवींद्र तौर व सचिव पंडितराव तडेगावकर व सर्व पदाधिकारी मंडळाने केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »