छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य नागरिकांना स्वत:चे घर उपलब्ध करुन देण्यासाठी म्हडाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर म्हाडाच्या आजच्या सोडतीत 1442 सदनिकासाठी 7881 अर्ज प्राप्त झाले. सदनिकांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करुन म्हाडावर विश्वास दाखविला आहे. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर मंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सदनिका संगणकीय सोडत समारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश एस. जी. शेटे, अप्पर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, म्हाडाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले, उपमुख्य अधिकारी जयकुमार नामेवार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, विजयादशमीच्या निमित्ताने आजची सोडत सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. म्हाडाच्यावतीने घेण्यात येणारी घरांची ऑनलाईन सोडत मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून दर्जेदार घरे मिळत आहेत. त्यामुळेच म्हाडाच्या घरांना नागरिकांची मागणी वाढतेच आहे. आजच्या सोडत प्रक्रियेतून घरे मिळणाऱ्या कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले.
म्हाडाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी प्रास्ताविक केले. श्री. नवले म्हणाले म्हाडाच्या आजच्या 1442 सदनिकांसाठी तब्बल 7881 अर्ज आले आहेत. म्हाडाच्या घरांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य कुटुंबांना घरे मिळावित हाच म्हाडाचा हेतू आहे. म्हाडाने घरासोबतच पर्यावरण संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. राज्यात 3 लाख वृक्ष लागवड म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येत असून यातील 70 हजार वृक्ष लागवड मराठवाडा विभागात करण्यात येणार आहे.
यावेळी योगेश नरहरी वैद्य व मंगेश देशमुख यांनी आजच्या सोडतीमध्ये घर मिळालाचा आनंदा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. खुप दिवसांपासून आपले असलेले घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.
आजच्या सोडतीचा निकाल म्हाडाच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचनाफलकावरही उपलब्ध आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला किंवा कार्यालयाला भेट द्यावे, असे आवाहन म्हाडाच्यावतीने करण्यात येत आहे.