dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सरपंच धावले पुरग्रस्तांच्या मदतीला; बारा महीन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील वरखेडा, खाणापूर गट ग्रामपंचायतचे सरपंच शेषराव नारायण जाधव यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्तांसाठी एक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपले ग्रामपंचायत सरपंच पदाचे बारा महीन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सुपूर्द केले आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आभाळ फाटल्याने शेतीसह सगळा संसार पाण्यात गेला आहे. शासनाची मदत म्हणजे, सरकारी काम बारा महीने थांब, असे असल्याने शासकीय मदत जेव्हा येईल, तेंव्हा येईल. शासनाच्या मदतीची वाट न पाहता, मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर, सर्व सामान्य जनतेवर ओढावलेले संकट व डोळ्यातून वाहत असलेले अश्रू पुसण्यासाठी, संकट काळी समाजासाठी काहीतरी द्यावे लागते, हे भान ठेवून तालुक्यातील गावागातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. हे पाहून सरपंच जाधव यांनी आपले बारा महीन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले आहे. आपल्या गावातील व परिसरातील गावातील समाजाशी बांधिलकी जपत सुख दुःखात वेळोवेळी ते मदत करतात. आपली नाळ नेहमी समाजासाठी जोडत असतात. सरपंच जाधव यांच्याप्रमाणे तालुक्यातील दान शुर व्यक्तीने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन खानापुरे वरखेडा ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top