जळगाव जामोद : गोरगरिबांचा रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबविली असून पुन्हा एकदा जळगाव जामोद नांदुरा मार्गावरील मानेगाव येथे 500 क्विंटल रेशनचा तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडून मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 28 सप्टेंबर च्या पहाटे साडेतीन वाजे दरम्यान करण्यात आले. या कारवाईमुळे राशन माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

नुकतेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाने खामगाव येथे विनापरवाना रेशनचा तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडल्याची घटना ताजी असतानाच पथकाला जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथे रेशनचा तांदूळ काळा बाजारात जात असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीवरून पथकाने 28 सप्टेंबर च्या पहाटे साडेतीन वाजे दरम्यान सापळा रचून नांदुरा जळगाव जामोद मार्गावरील मानेगाव फाट्याजवळ सापळा रचून नाकाबंदी केली. दरम्यान या मार्गावरून येत असलेला ट्रक क्रमांक जी जे 03 सियू 2282 या ट्रकला थांबवून चौकशी केली असता सदर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात राशनचा तांदूळ आढळून आला. यावेळी पथकाने सदर ट्रक ताब्यात घेऊन ट्रक मधील तिघांना गजाआड केले आहे. ट्रकची चौकशी केली असता ट्रक मध्ये सुमारे 687 तांदळाचे पोटे असा एकूण 580 क्विंटल तांदूळ आढळून आला. सदर तांदळाची किंमत अंदाजे 17 लाखांचे वर असल्याचे समजते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवाह सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कार्यवाहीसाठी अन्नपुरवठा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, एपीआय प्रताप बाजड पोहेकॉ. राजू टेकाळे, जगदीश टेकाळे, अमोल शेजोळ, मंगेश सांगाडे, विकास देशमुख निलेश राजपूत यांनी केली.