छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवास शनिवार, २७ सप्टेंबर रोजी शोभायात्रेने प्रारंभ होणार आहे. युवक महोत्सवाचे उद्घाटन ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या नाटयगृहात होणार असून युवक महोत्सवासाठी पाच रंगमंच तयार करण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. महोत्सवात चार जिल्हयातून २६२ संघ आणि १ हजार २१ कलावंत सहभागी होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते शनिवारी होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.विजय फुलारी राहणार आहेत. यावेळी विभागाचा माजी विद्यार्थी तथा दिग्दर्शक रावबा गजमल, प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.योगिता होके पाटील, अॅड.दत्तात्रय भांगे, संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची उपस्थिती राहणार आहे.