नायगाव : राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरा-मलकापूर मार्गावर एक मोठी घटना घडली आहे. नायगाव फाट्याजवळ अवैधरित्या सुरू असलेल्या बायो डिझेलच्या टाकीत पडून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला असून एक जण अत्यवस्थ झाल्याची घटना 25 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजता दरम्यान उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा अवैध बायो डिझेल पंपांचा विषय ऐरणीवर आला असून महसूल आणि पोलीस विभागाचे या अवैध बायोडिझेल पंपावर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

नांदुरा तालुक्यातील नायगाव फाट्यावर मागील अनेक दिवसापासून अवैधरित्या बायो डिझेल पंप सुरू आहे. सदर पंपावर 25 सप्टेंबरच्या रात्री साजीद खान जलील खान 22, मुस्ताक खान जब्बार खान 38 आणि आरीफ खान बशीर खान व अधिक एक असे चौघे इसम पंपामधील जमीनीत असलेल्या बायो डिझेलच्या टाकीची सफाई करण्यासाठी उतरले होते. परंतु चौघांनाही टाकीमध्ये गुदरमरल्यासारखे होत होते. त्यामुळे त्यांनी आरडा ओरड केली. यावेळी पंपावर असलेल्या इतर नागरिकांनी त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान साजीद खान जलील खान, मुस्ताक खान जब्बार खान या दोघांचा टाकीमध्ये गुदमरून अंत झाला तर आरीफ खान बशीर खान व आणखी एकास बाहेर काढून तातडीने मलकापूर येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अशी माहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच याबाबत ज्ञानेश्वर डांबरे यांनी त्वरित ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर यांना माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन तिघांना तातडीने मलकापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी डॉक्टरांनी साजीद खान जलील खान, मुस्ताक खान जब्बार खान यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तर आरीफ खान व त्याच्या साथीदारावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी नांदुरा पोलिसांनी पोहचून पंचनामा केला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
मागील वर्षीही सदर टाकीत पडून एका तरूणाचा मृत्यू झाला होता
सदर बोयो डिझेल पंप हा मलकापूर येथील पारपेठ भागातील एका व्यावसायीकाचा असल्याची माहिती आहे. सदर बायो डिझेल पंपामध्ये मागील वर्षीसुध्दा एक तरूण कामगार पडून त्याचा करून अंत झाला होता. सदर माहिती मिळताच महसूल आणि पोलीस विभागाने मागील वर्षभरापासून सदर पंप सिल केल्याची माहिती आहे. पंरतु आता पुन्हा सदर पंप सुरू केल्याने बायो डिझेलच्या टाक्याची साफसफाई करण्यासाठी सदर व्यावसायिकाने मलकापूर येथून चार इसम आणल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी महसूल विभागा आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.