मानोरा : तालुक्यातील कुपटा – दारव्हा रोडवरील कुपटा हद्दीत ढाबा धरणाजवळ काही महिन्यांपासून बेकायदा गुलाम झन्ना खेळ खुलेआम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस प्रशासनाच्या हातमिळवणीनं हा अवैध खेळ फोफावत असून, यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा स्थानिकांत रंगली आहे. सदर प्रकाराकडे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सविस्तर असे की, कुपटा शिवारातील धरणाच्या परिसरात एका शेतात मंडप टाकून हा बेकायदा गुलाम झन्ना खेळ रोज सायंकाळी सहा वाजता सुरू केला जातो. बोरी अरब व दारव्हा भागातील खावाल या खेळाचे संचालन करतात. रात्रभर सुरू राहणाऱ्या या अवैध जुगार खेळात चारचाकी वाहनांतून आलेले जुगारी मोठ्या संख्येनं सहभागी होतात. चार-पाच दिवसांपूर्वी पत्ते काटण्यावरून जुगाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर खेळ काही दिवस बंद झाला असला तरी पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा आहे. लाखोंची उलाढाल असलेला हा बेकायदा गुलाम झन्ना खेळ तात्काळ बंद करण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे.
गुलाम जुगाराचा खेळ चालत असल्याची अद्याप कोणतीही ठोस माहिती आमच्याकडे नाही. बहुधा हा खेळ रात्रीच्या वेळी सुरू होत असावा. योग्य माहिती घेऊन आणि चौकशी करून कारवाई केली जाईल.
– सुभाष महाजन, पोलीस उपनिरीक्षक