गंगापूर : तलवार हातात घेवून दहशत माजवित फिरणाऱ्या शाहराम पंढरीनाथ भवंर, (३० वर्ष), रा. समतानगर, गंगापूर याला गस्तीवरील स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई रविवार, 21 सप्टेंबर रोजी गंगापूर – वैजापूर रोडवरील महावितरणच्या सबस्टेशनसमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये करण्यात आली.

स्थानिक गुन्हेशाखेचे पथक गंगापूर ते वैजापूर रस्त्यावर रविवारी गस्त घालत होते. त्यावेळी महावितरणच्या सबस्टेशनसमोर असलेल्या हॉटेलजवळ एक जण हातात तलवार घेवून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून शाहराम भवंर याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या ताब्यातून एक साडेपाच हजार रुपये किंमतीची तलवार जप्त केली. स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस अंमलदार वालिम्क निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शाहराम भंवर याच्याविरुध्द गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंग राठोड, सहाय्यक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार विठ्ठल जाधव करीत आहेत.