संविधानामुळे सामान्य माणसाचाही विकास होतो : पालकमंत्री संजय शिरसाठ : मुक्तिसंग्राम मराठवाड्याचा, जागर संविधानाचा कार्यक्रम उत्साहात

छत्रपती संभाजीनगर :  संविधानामध्ये मोठी ताकद आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी हक्क आणि कर्तव्य संविधानाने बहाल केले आहेत, संविधानानुसार  सामान्यातला सामान्य माणूसही सशक्त आणि विकसित होतो, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी बुधवार, 17 सप्टेंबर रोजी केले.

छत्रपती संभाजीनगर :  संविधानामध्ये मोठी ताकद आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी हक्क आणि कर्तव्य संविधानाने बहाल केले आहेत, संविधानानुसार  सामान्यातला सामान्य माणूसही सशक्त आणि विकसित होतो, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी बुधवार, 17 सप्टेंबर रोजी केले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने तापडिया नाट्यगृह येथे “मुक्ती संग्राम मराठवाड्याचा, जागर संविधानाचा “या कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, डॉ. अनंत राऊत, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, जात पडताळणीच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे, बार्टीच्या व्यवस्थापक नसरीन तांबोळी, प्रकल्प अधिकारी सोनवणे आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री संजय शिरसाट पुढे म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास तरुण पिढीने समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संविधानाची व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन जीवनामध्ये सशक्त बनले पाहिजे. माझ्यासारखा सामान्य माणूस संविधानाच्या ताकदिने मंत्री पदापर्यंत पोहोचू शकला,अशी किमया संविधानात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.अनंत राऊत यांनी देशांमध्ये संविधान संस्कृती रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.बार्टी सातत्याने संविधानाचा जागर करते ही भूषणवह बाब असल्याचे ते म्हणाले. रवींद्र जोगदंड यांनीही राष्ट्रीय विकासात संविधानाचे महत्त्व विशद करून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »