सिंदखेड राजा : ‘इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ या उक्तीप्रमाणे ‘अदिती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ ने राज्यात सर्व दूर आपल्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, व्यापारी आणि उद्योजक यांना एकत्र आणण्यामध्ये तसेच समाजातील उपेक्षित, दुर्बल घटकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न अदिती अर्बनने सातत्याने केला आहे. संस्थेने नेहमी सामान्यांना प्राधान्य दिल्याने आजरोजी लाखो सभासदांचा विश्वास जिंकण्यात यश मिळाले. सांघिक भावनेतून निर्माण झालेली ही पतसंस्था सर्वोत्कृष्ट ठरली असून, राज्यभरात निष्कलंकित कामकाजाचा ठसा उमटवीत आहे, असे गौरवोद्गार अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी काढले.

मातृतीर्थात २२ वी आमसभा : लाखो सभासदांच्या विश्वासाचा दैदिप्यमान सोहळा
सिंदखेड राजा : ‘इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ या उक्तीप्रमाणे ‘अदिती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ ने राज्यात सर्व दूर आपल्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, व्यापारी आणि उद्योजक यांना एकत्र आणण्यामध्ये तसेच समाजातील उपेक्षित, दुर्बल घटकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न अदिती अर्बनने सातत्याने केला आहे. संस्थेने नेहमी सामान्यांना प्राधान्य दिल्याने आजरोजी लाखो सभासदांचा विश्वास जिंकण्यात यश मिळाले. सांघिक भावनेतून निर्माण झालेली ही पतसंस्था सर्वोत्कृष्ट ठरली असून, राज्यभरात निष्कलंकित कामकाजाचा ठसा उमटवीत आहे, असे गौरवोद्गार अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी काढले.

अदिती अर्बनची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, १४ सप्टेंबर रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत जिजाऊ सृष्टीवर पार पडली. यावेळी अध्यक्ष स्थानावरून सुरेश देवकर बोलत होते. याप्रसंगी, व्यासपीठावर उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी दिनकरराव चिंचोले,
संचालक सुशील पनाड, विजय पाटील, संजय जाधव, विनायक वाघ, अरुण पाटील, विधीतज्ञ राजेश देवकर, आत्माराम पायघन उपस्थित होते. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुरेश देवकर म्हणाले, संस्थेची ही २२ वी आमसभा आहे. अर्थात, दोन तप उलटले असून आता एका पिढीचा अनुभव प्राप्त झाला. निश्चितपणे सुरुवातीचा काळ संघर्षाचा असतो. संघर्षाचा खडतर प्रवास करीत संपूर्ण राज्याचे जाळे अदिती अर्बनने व्यापले. आम्ही केवळ विश्वस्त आहोत, ठेवीदारांच्या पैशांचा उपभोग घेण्याचा आम्हाला अधिकार नाही. संचालक मंडळांनी एक वेगळा आदर्श सहकार क्षेत्रात निर्माण केला आहे. कुठल्याच संचालकाने आजवर संस्थेच्या योजनेचा व पैशाचा उपभोग घेतलेला नाही. जिजाऊ सृष्टीवर आमसभेचे नियोजन करण्यामागचे कारण सांगताना, देवकर सर म्हणाले, संस्थेची रुजवात करताना माझ्यासमोर छत्रपती शिवरायांचे स्वराज्य होते. छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीत नतमस्तक होण्याचे भाग्य मिळेल म्हणून मातृतीर्थात ही आमसभा ठेवण्यात आली. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राला मदत कार्य करताना लोकांच्या हृदयामध्ये आमचे स्थान निर्माण झाल्याचा अनुभव देखील मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ठेवीदारांचा विश्वास आणि कर्जदारांचा सन्मान या समीकरणातून संस्थेने प्रगती साध्य केली. सांघिक भावनेतून वाटचाल करणारी अदिती अर्बन आज रोजी महाराष्ट्रभर सर्वोत्कृष्ट ठरली असल्याचे देवकर सर म्हणाले. सूत्रसंचालन विभागीय व्यवस्थापक प्रा. राजू वैद्य यांनी केले. कामकाज विषय पत्रिकेचे वाचन अरुण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरव्यवस्थापक शैलेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड राजा विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अदिती अर्बनचे राज्यव्यापी काम : चिंचोले
आपल्या प्रास्ताविकातून अदिती अर्बनचा प्रगती अहवाल सादर करताना उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी दिनकरराव चिंचोले म्हणाले, आज रोजी एक हजार कोटींच्या ठेवीकडे वाटचाल असल्याने संस्थेच्या कामाला अधिक गती आली आहे. शेकडो कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असून अदिती अर्बनचे राज्यव्यापी काम सुरू असल्याचे दिनकरराव चिंचोले यांनी स्पष्ट केले. विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे नाते जोपासत असताना सुरेश देवकर सरांनी मित्रत्वाचे नाते निर्माण केले, असेही चिंचोले म्हणाले.
सभेला हजारोंची हजेरी…
अदिती अर्बनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासद, ठेवीदार, राज्यभरातील शाखेवरील स्थानिक संचालक मंडळाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.