महायुतीमध्ये कार्यकर्त्यांना काहीच मिळत नाही, पण..; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा 

बुलढाणा : ‘देशाच्या राजकारणात रिपाई (आठवले गट) सक्रिय असून, महायुतीतील घटक पक्ष म्हणून भूमिका बजावत आहे. माझ्यावर मंत्रीपदाची जबाबदारी असून, या पदावर कार्यकर्ते खुश आहेत. परंतु, कार्यकर्त्यांना महायुतीमध्ये काहीच मिळत नाही, अशी सल व्यक्त करत येत्या काळात दोनतरी महामंडळाचे अध्यक्ष पद मिळाले पाहिजेत’, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री डॅा. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात ७ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री डॅा. रामदास आठवले यांची पत्रकार परिषद

बुलढाणा : ‘देशाच्या राजकारणात रिपाई (आठवले गट) सक्रिय असून, महायुतीतील घटक पक्ष म्हणून भूमिका बजावत आहे. माझ्यावर मंत्रीपदाची जबाबदारी असून, या पदावर कार्यकर्ते खुश आहेत. परंतु, कार्यकर्त्यांना महायुतीमध्ये काहीच मिळत नाही, अशी सल व्यक्त करत येत्या काळात दोनतरी महामंडळाचे अध्यक्ष पद मिळाले पाहिजेत’, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री डॅा. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात ७ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

  लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या जंयती उत्सवानिमित्त शेगाव  येथे आयोजित कार्यक्रमानिमित्त ना. आठवले बुलढाणा जिल्ह्यात आले होते. कार्यक्रमानंतर बुलढाणा शहरातील शासकीय विश्रामगृहात ना. आठवले यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.  यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ना. आठवले म्हणाले, माझ्या मंत्रीपदावर कार्यकर्ते खुश आहेत. कार्यकर्त्यांना देखील संधी मिळाली पाहिजेत. त्या अनुषंगाने आगामी निवडणुकीनंतर आरपीआईला दोन तरी  महामंडळे मिळावी, अशी चर्चा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली आहे. इतकेच नाही तर, राज्याच्या मंत्रीमंडळात एक मंत्रीपद बाकी असून, आमच्यासाठीचे ते ठेवलेलं असावं, अर्थात ते आम्हाला मिळावं अशी मागणीही ना. आठवले मांडली.  पत्रकार परिषदेत बुलढाण्याचे शिवसेनेचे आ. संजय गायकवाड, रिपाईचे (आठवले गट) राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम, विदर्भ संपर्कप्रमुख बाबासाहेब जाधव यांसह आदी उपस्थित होते. 

शासननिर्णय ओबीसींवर अन्यायकारक ठरणार नाही’

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना याचा लाभ होणार असून,  हा निर्णय ओबीसींवर अन्यायकारक ठरणार नाही, असे सांगत कॉँग्रेसने आजवर  केवळ आरोप केले असल्याची टीका ना. रामदास आठवले यांनी केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »