सिल्लोड : तालुक्यातील सारोळा ते लिहाखेडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर पडलेल्या खड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. संबंधित विभागाने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सारोळा व लिहाखेडी येथील ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर ते जळगांव महामार्गावरील सिल्लोड तालुक्यातील सारोळा ते लिहाखेडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याची खडी वर आल्याने दुचाकी वाहने घसरुन अपघात होण्याचा धोका वाढला आहे. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी खड्यात साचत असल्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागतात. संबंधित विभागाने त्वरीत या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच लवकरात लवकर रस्त्याचे काम न झाल्यास मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.