छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शनिवार, 23 ऑगस्ट रोजी पाच वाजेच्या सुमारास विमानाने आगमन झाले.

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शनिवार, 23 ऑगस्ट रोजी पाच वाजेच्या सुमारास विमानाने आगमन झाले.
प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट ,इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, खा. डॉ. भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे,तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड उपस्थित होते. त्यानंतर फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन कार्यक्रमास ते रवाना झाले.