धाड : आदिती अर्बन को- ऑपरेटिव्ह सोसायटीने सदैव समाजातील सर्वच घटकातील लोकांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असते असे प्रतिपादन अतिथी अर्बन ऑ. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर यांनी केले.

धाड : आदिती अर्बन को- ऑपरेटिव्ह सोसायटीने सदैव समाजातील सर्वच घटकातील लोकांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असते असे प्रतिपादन अतिथी अर्बन ऑ. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर यांनी केले.
ते आदिती अर्बन धाड शाखा स्थलांतर सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख उपस्थितीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण नामदेव तायडे तर उद्द्घाटक धाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक प्रताप भोस हे होते. पुढे बोलताना देवकर म्हणाले की धाड ही कर्मभुमी असून धाड परिसरातच पहील्यांदा धाड, रुईखेड, वरूड , चांडोळ येथे अदिती अर्बन को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या शाखा उघडल्या आणि समाजातील सर्वच घटकांनी अदिती अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीवर विश्वास दाखवत आज या सोसायटीच्या जवळपास ६५ शाखा निर्माण झाल्या. हे करीत असताना केवळ संस्थापक अध्यक्ष या नात्याने फक्त घेण्याच काम न करता समाजाला देण्याच पण काम केले. धाड येथे झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लागलेला सर्व खर्च अदिती अर्बन को. ऑपरेटीव्ह सोसायटीचा असुन अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा खर्च सोसायटीने केलेला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष दिनकरराव चिंचोले यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रताप भोस यांनी संस्थेच्या कार्याबद्दल कौतूक केले. निवृत्त पोलीस निरीक्षक रामकृष्ण तायडे यांनी पण समाधान व्यक्त केले. याप्रसंगी धाड शाखेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
