dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भिंगारा घाटातील खोल दरीत आयशर वाहन कोसळले दोन जण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

जळगाव जामोद: तालुक्यात जळगाव जामोद- बऱ्हाणपूर मार्गावर असलेल्या भिंगारा घाटात 500 मीटर खोल दरीत आयशर वाहन कोसळले आहे. ही घटना 10 ऑगस्ट रोजी घडली. झालेल्या या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना अमरावती येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मृतकांमध्ये प्रभू दिलीप मोड आणि सावन मनोहर दहीकर दोघे रा. नागपूर गुमगाव यांचा समावेश आहे. तर अमर हरीराम उईके आणि विजय सहदेव उईके दोघे रा. अमरावती गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जळगाव जामोद येथील रुग्णालयातून अमरावतीला रेफर करण्यात आले आहे. आयशर क्रमांक एमएच 27 एक्स 7875 हे वाहन बुऱ्हानपूर कडून जळगाव जामोद मार्गे अमरावती कडे जात असतांना जळगाव जामोद वनपरीक्षेत्रातील भिंगारा जंगलातील दरीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दरीत जाऊन कोसळले. घटनेची माहिती मिळताच तातडीने नागरिकांनी मदत कार्य करत जखमींना तातडीन दरीतून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रूग्णालयात हलविले. यावेळी जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतकांचे शव ताब्यात घेऊन अमरावती येथे रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top