बुलढाणा : जवळपास तीन आठवड्यापासून उसंत घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. गत काही दिवसांपूर्वीच मेहकर – लोणार तालुक्यात पावसाने जोरदार प्रदर्शन केले होते. दरम्यान, २२ जुलैच्या उत्तर रात्रीपासून लोणार तालुक्यात आभाळ फाटल्यागत पाऊस होत आहे. नदी नाले एक झाले असून, शेकडो हेक्टर जमीन पुन्हा खरडून गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मृग कोरडा जात असताना, जून महिन्याच्या शेवटी शेवटी २५ जून रोजी मेहकर लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. यावेळी २३ हजार ३३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. परंतु आता पुन्हा जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासूनच तालुक्यातील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने, हिरडव, बोरखेडी, गुंधा या गावांमध्ये नुकसान झाल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे सुचित करण्यात आले आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा पोहोचत असल्याची माहिती आहे.