फिडर सेपरेशनमुळे वितरन हानी कमी होवून वीज पुरवठ्यात गुणात्मक सुधार होणार: मुख्य अभियंता राजेश नाईक

बुलढाणा: महावितरण अकोला परिमंडळात आरडीएसएस  योजनेअंतर्गत प्रस्तावित १७८ पैकी ६२ फिडर सेपरेशनचे काम पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आले आहे,११ फिडरचे काम पूर्ण झाले असून १०५ फिडरचे काम प्रगतीपथावर आहे.फिडर सेपरेशनमुळे वितरण हानी कमी होवून वीज पुरवठ्यात गुणात्मक सुधारणा होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिली.

परिमंडळात १७८ पैकी ६२ फिडरचे झाले विलगीकरण

बुलढाणा: महावितरण अकोला परिमंडळात आरडीएसएस  योजनेअंतर्गत प्रस्तावित १७८ पैकी ६२ फिडर सेपरेशनचे काम पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आले आहे,११ फिडरचे काम पूर्ण झाले असून १०५ फिडरचे काम प्रगतीपथावर आहे.फिडर सेपरेशनमुळे वितरण हानी कमी होवून वीज पुरवठ्यात गुणात्मक सुधारणा होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिली.

 विद्युत भवन येथे आरडीएसएस योजनेअंतर्गत होत असलेल्या फिडर सेपरेशनच्या कामाचा मुख्य अभियंता यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा दिपक सोनोने,अतीरिक्त कार्यकारी अभियंता यामिनी पिंपळे,तसेच महावितरणचे सहाय्यक अभियंते (इन्फ्रा) – अकोला ग्रामीण, अकोट, खामगाव, बुलढाणा, मलकापूर व वाशीम विभाग, तसेच ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे प्रतिनिधी आणि  फिडर सेपरेशनचे काम करत असलेल्या मे.अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे प्रकल्प व्यवस्थापक  उपस्थित होते.

         मुख्य अभियंता म्हणाले की, फिडर विलगीकरणामुळे वितरण हानी कमी होवून वीज सेवेत गुणात्मक सुधारणा होणार असल्याने काम पूर्ण करण्यासाठी वेळपालन आणि ठरवलेल्या नियोजनानुसार होणे अपेक्षीत आहे.तथापि विभागनिहाय आढावा घेतल्यानंतर अद्याप १०५ फिडरचे काम अपूर्ण असल्याने कंत्राटदार संस्थेंच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्वरित मनुष्यबळात वाढ करून कामाची गुणवत्ता राखून वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

       याबैठकीत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करून वेळपालनाचे पालन करण्यावर भर देण्यात आला असून ८० % पर्यंत काम पूर्ण झालेल्या सर्व फिडरची प्रगती तपासून त्या फिडरचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक ठरवण्यात आले. त्याचबरोबर आर.वो.डब्लू च्या कामाच्या अडचणीवर तातडीने उपाययोजना करण्याचे, तसेच केंद्र शासनाच्या ग्रामीण विद्युतीकरण महामंडळामार्फत कामाच्या निरिक्षणासाठी नेमलेल्या त्रयस्त यंत्रणेमार्फत निदर्शनास आणून देण्यात आलेल्या दोषांवर दुरूस्ती करण्याचे निर्देश मुख्य अभियंता यांनी दिले.

       आरडीएसएस योजनेत करण्यात येत असलेली फिडर सेपरेशनच्या कामामुळे कृषी फिडर आणि गावठाण फिडर वेगळे करण्यात येत आहे. अकोला परिमंडळाअंतर्गत १७८ फिडर वेगळे करण्याचे काम प्रस्तावित असून यामध्ये अकोला जिल्ह्यातील ९६ फिडरचा समावेश आहे,पैकी ३४ चे काम पूर्ण झाले असून ६१ चे प्रगती पथावर आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ६३ पैकी ३३ चे काम पूर्ण झाले असून ३० चे काम प्रगतीपथावर आहे. वाशीम जिल्ह्यात १९ पैकी ५ फिडरचे काम पूर्ण झाले असून १४ फिडरचे काम प्रगतीपथावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »