छत्रपती संभाजीनगर : पूर्ववैमनस्यातून दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी कोयत्याने डोक्यात वार करुन 47 वर्षीय माजी सरपंच राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे (47 वर्ष) रा. सिरजगाव ता. कन्नड यांचा खून केला होता. ही घटना 12 जुलै रोजी कन्नड तालुक्यातील सिरजगाव शिवारात घडली. याप्रकरणी पेालिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन मारेकऱ्यांना अटक केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी रविवार, 13 जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद अमर राजपूत (25 वर्ष), समीर समद कुरैशी (20 वर्ष), इरफान शकील शहा (20 वर्ष) सर्व रा. सिरजगाव ता. कन्नड अशी आरोपींची नावे आहेत. मयत राजू चुंगडे हे 12 जुलै रोजी सकाळी आपल्या गट नंबर 28 मधील जैतापूर ते सिरजगाव रस्त्यावरील शेतात मक्का पिकाला खत टाकण्यासाठी दोन ते तीन मजूर येणार असल्याने गेले होते. यावेळी त्यांनी मजुरांना रासायनिक खत मिक्स करुन दिले, तर मजूर खताच्या गोण्या घेवून शेतातील घरामागे असलेल्या मक्याच्या शेतात गेले होते. त्यावेळी राजू चुंगडे हे घरासमोर एकटेच उभे असतांना दुचाकीवरुन आलेल्या तीन जणांनी त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन त्यांचा खून केला होता. याप्रकरणी सुरज राजाराम चुंगडे यांच्या तक्रारीवरुन मारेकऱ्यांविरुध्द कन्नड ग्रामीण पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे, सुधीर मोटे, पोलिस अंमलदार श्रीमंत भालेराव, वाल्मीक निकम, विठ्ठल डोक, शिवानंद बनगे, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, अशोक वाघ, महेश बिरुटे, योगेश तरमळे, जीवन घोलप, कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामचंद्र पवार, उपनिरीक्षक जाधव आदींच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून आनंद राजपूत, समीर समद कुरैशी, इरफान शकील शहा यांना अटक करुन चौकशी केली असता त्यांनी माजी सरपंच राजराम उर्फ राजू चुंगडे यांची कोयत्याने वार करुन खून केल्याची कबूली दिली.