भरधाव प्रेम! पोलिसांचा पाठलाग, नाकाबंदी आणि प्रेमीयुगुल पालकांच्या ताब्यात !

माहोरा : मलकापूर येथून घरच्यांच्या नकळत पळून गेलेले प्रेमी युगुल अखेर पोलिसांच्या कारवाईत पकडले गेले. गुरुवार, 10 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद कार दिसताच त्यांनी पाठलाग केला. भरधाव  कार पळवणाऱ्या चालकाला रोखण्यासाठी जाफराबाद व भोकरदन पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आणि प्रेमीयुगुलाला पालकांच्या ताब्यात दिले.

गणेश पगारे / माहोरा : मलकापूर येथून घरच्यांच्या नकळत पळून गेलेले प्रेमी युगुल अखेर पोलिसांच्या कारवाईत पकडले गेले. गुरुवार, 10 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद कार दिसताच त्यांनी पाठलाग केला. भरधाव  कार पळवणाऱ्या चालकाला रोखण्यासाठी जाफराबाद व भोकरदन पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आणि प्रेमीयुगुलाला पालकांच्या ताब्यात दिले.

गुरूवारी दीडच्या सुमारास जाफराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी विजय देशपांडे, विजय जाधव, संतोष डोईफोडे हे माहोरा परिसरात गस्त घालत असताना ( एमएच २८ सीसी ११२१ ) या क्रमांकाची कार संशयास्पद हालचाली करताना आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने गाडी वेगाने पळवली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ भोकरदन पोलिस ठाण्याशी संपर्क साधून कार  पकडण्यासाठी सापळा रचला. उपनिरीक्षक संतोष कुकलारे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी करण्यात आली. काही मिनिटांतच संबंधित कार तिथे येताच पोलिसांनी तिला थांबवले. कारची झडती घेतली असता एक तरुण व एक तरुणी आढळून आली.

चौकशीत दोघांनी पुण्याकडे जात असल्याची कबुली दिली. मात्र त्यांच्या अंगावरील थरथर आणि घाबरलेली स्थिती पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांना भोकरदन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. अधिक विचारपूस केल्यानंतर दोघेही मलकापूरचे रहिवासी असून घरच्यांना न सांगता पळून आल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्यांच्या पालकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. समुपदेशन घेतल्यानंतर व दोघांच्याही परस्पर संमतीने अखेर त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई करताना पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि समजूतदारपणाचे कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »