dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अवैध दारू विक्री विरोधात कारवाईचा धडाका: १५ दिवसांत तब्बल ८.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त  

बुलढाणा : जिल्ह्यातील विविध भागात होत असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चालू महिन्यातील १५ दिवसांत दारूविक्री, जुगार प्रकरणात ४९ जणांवर गुन्हे दाखल करित तब्बल ८ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत  करण्यात आला आहे. 

बुलढाणा : जिल्ह्यातील विविध भागात होत असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चालू महिन्यातील १५ दिवसांत दारूविक्री, जुगार प्रकरणात ४९ जणांवर गुन्हे दाखल करित तब्बल ८ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत  करण्यात आला आहे. 

मलकापूर ग्रामीण, रायपूर, मेहकर, बोराखेडी, खामगाव ग्रामीण, बुलढाणा शहर, जानेफळ, जळगाव जा, सिंदखेड राजा, नांदूरा या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री जोमाने सुरू होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक स्थापित करित उपरोक्त ठिकाणी छापा टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.  

कारमधून देशी दारूची वाहतूक; आरोपी ताब्यात 

मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका ठिकाणी  १५ जून रोजी इंडिका व्हीस्टा कंपनीच्या कारमधून देशी दारूच्या  तब्बल २६ बॉक्सची  वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधारे विणी फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध  मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन नयनसिंग जाधव (37 वर्ष,  रा. घिणी ता. मलकापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून देशी दारुच्या शिश्यांनी भरलेले 26 बॉक्स (किंमत 88,620), पांढऱ्या रंगाची टाटा व्हिस्टा गाडी (किंमत २लाख) असा एकूण 2 लाख 88 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

कारवाई पथक 

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक लांडे, यांच्या नेतृत्वात सपोनि संजय मातोंडकर, पोहेकॉ, दिगंबर कपाटे, विजय पैठणे, रघूनाथ जाधव, पोना. विजय वारुळे, पोकॉ  मनोज खरंडे, पोकॉ हर्षल जाधव, चालक पोहेकॉ समाधान टेकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top