dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

लाचखोर महिला पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात रेशन दुकानाचे निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी घेतली लाच

छत्रपती संभाजीनगर : तक्रारदाराच्या नावे वारसाने प्राधिकृत केलेल्या रेशन दुकानाचे प्राधिकारपत्राचे निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागून 40 हजार रुपये स्विकारणाऱ्या गंगापूरच्या लाचखोर महिला पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गजाआड केले. ही कारवाई शनिवार, 14 जून रोजी रेल्वेस्टेशन परिसरातील वस्तू व सेवा कर भवनच्या गेटवर करण्यात आली. 

छत्रपती संभाजीनगर : तक्रारदाराच्या नावे वारसाने प्राधिकृत केलेल्या रेशन दुकानाचे प्राधिकारपत्राचे निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागून 40 हजार रुपये स्विकारणाऱ्या गंगापूरच्या लाचखोर महिला पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गजाआड केले. ही कारवाई शनिवार, 14 जून रोजी रेल्वेस्टेशन परिसरातील वस्तू व सेवा कर भवनच्या गेटवर करण्यात आली. कांचन नामदेवराव कांबळे (34 वर्ष), रा. फ्लॅट नंबर 701, रुबी इनसिग्निया अपार्टमेंन्ट, हमालवाडा परिसर असे लाचखोर पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय तक्रारदार यांच्या आजोबाच्या नावे गंगापूर तालुक्यातील मौजे काटेपिंपळगाव येथे रास्त भाव दुकान क्रमांक 29 आहे. या रास्त भाव दुकानाचे तक्रारदाराच्या नावे वारसाने प्राधिकृत केलेले दुकानाचे प्राधिकारपत्राचे निलंबन मागे घेण्यासाठी तक्रारदाराने गंगापूरच्या पुरवठा निरीक्षक कांचन कांबळे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी कांचन कांबळे यांनी स्वत:साठी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी 70 हजार रुपये लाच देण्याची मागणी केली होती. तडजोडीअंती कांचन कांबळे यांच्यासाठी 15 हजार रुपये आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी 25 हजार रुपये असे 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे, गोरखनाथ गांगुर्डे, पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे, पोलिस अंमलदार राजेंद्र जोशी, डोंगरदिवे, सी.एन.बागुल, पुष्पा दराडे, आशा कुंटे आदींच्या पथकाने रेल्वेस्टेशन परिसरातील वस्तू व सेवा कर भवनच्या गेटवर सापळा रचून लाचखोर कांचन कांबळे यांना 40 हजार रुपयांची लाच घेतांना पकडले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top