dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वीज कोसळून 17 शेळ्या ठार; शेलापूर – निमखेड रस्त्यावरील घटना 

मोताळा : वादळी वाऱ्यासह  झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागातील नुकसान झाले. यामध्येच, गुरुवारी सायंकाळी मोताळा तालुक्यातील शेलापूर – निमखेड रस्त्यावरील एका शेतानजीक वीज  कोसळून तब्बल 17 शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. 

मोताळा : वादळी वाऱ्यासह  झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागातील नुकसान झाले. यामध्येच, गुरुवारी सायंकाळी मोताळा तालुक्यातील शेलापूर – निमखेड रस्त्यावरील एका शेतानजीक वीज  कोसळून तब्बल 17 शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. 

   मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात पावसाला उसंत होता.  दरम्यान, हवामान विभागाने 12 ते 14 जून या कालावधीत विदर्भात कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, 12 जून रोजी  बुलढाणा, चिखली, मोताळा तालुक्याला पावसाने झोडपले. वादळी वेगाने झालेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. मोताळा तालुक्यातील शेलापूर – निमखेड रस्त्यावर असलेल्या श्रीराम खराटे यांच्या शेताजवळ वीज कोसळली. यावेळी तब्बल 17 शेळ्या याठिकाणी होत्या; अंगावर वीज कोसळून क्षणार्धातच शेळ्या मृत्युमुखी पडल्या.  याघटनेनंतर, शेलापूर येथील ग्राम महसूल अधिकारी व्ही. बी. उबरहंडे यांनी पंचनामा केला. 

चार शेतकऱ्यांचे नुकसान 

नुकसानीच्या  अहवाला नुसार शेतकरी ओंकार नारायण वाघ व ईश्वरदास बावस्कर  यांच्या प्रत्येकी  दोन शेळ्या,  निना नारायण वैतकार यांची एक, तर सुधाकर बोरसे यांच्या सर्वाधिक 12 शेळ्या ठार झाल्याने त्यांचे  मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top