dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रेल्वे अपघातात मृतकांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील युवकाचा समावेश

बुलढाणा : मुंबई मध्ये झालेल्या भीषण ट्रेन अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील एका युवकाचाही समावेश आहे. हा युवक मागील सुमारे चार वर्षांपासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्याच्या अपघाती निधनाची बातमी येऊन धडकताच देऊळगाव राजा तालुक्यात जुमडा गावात शोककळा पसरली.

विकी मुख्यदल असे मृतक युवकाचे नाव आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत विकी मुख्यदल हा देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावाचा रहिवासी होता. ९ जून रोजी सकाळी कसारा लोकलमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील युवकाचा देखील समावेश असल्याने जिल्ह्यातही हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top