dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालना, छञपती संभाजीनगरच्या अधीक्षकपदी नवे अधिकारी 

जालना :  मद्यविक्रीतून राज्याचा महसूल वाढविणे आणि अवैध मद्यविक्रीला आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील आठ अधीक्षकांच्या शुक्रवार, 30 मे रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठवाड्यातील छञपती संभाजीनगर, नांदेड आणि जालना येथे नवे अधीक्षक बदलीने येत आहे. यातील जालना येथील पद रिक्त होते. त्यामुळे तेथील अधीक्षक पदाचा प्रभारी कार्यभार छञपती संभाजीनगर येथील अधीक्षकांना देण्यात आला होता. धाराशिव येथील अधीक्षक गणेश बारगजे यांची पालघर येथे बदली झाली आहे. 

विनोद काळे /जालना :  मद्यविक्रीतून राज्याचा महसूल वाढविणे आणि अवैध मद्यविक्रीला आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील आठ अधीक्षकांच्या शुक्रवार, 30 मे रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठवाड्यातील छञपती संभाजीनगर, नांदेड आणि जालना येथे नवे अधीक्षक बदलीने येत आहे. यातील जालना येथील पद रिक्त होते. त्यामुळे तेथील अधीक्षक पदाचा प्रभारी कार्यभार छञपती संभाजीनगर येथील अधीक्षकांना देण्यात आला होता. धाराशिव येथील अधीक्षक गणेश बारगजे यांची पालघर येथे बदली झाली आहे. 

     जालना येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन अधीक्षक पराग नवलकर यांची बदली झाल्यानंतर येथील अधीक्षक पदाचा प्रभारी कार्यभार छ्त्रपती संभाजीनगर येथील अधीक्षक संतोष झगडे यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान, शुक्रवारी राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव रवींद्र औटे यांच्या सहीने राज्यातील आठ अधीक्षकांच्या नियतकालिक बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पालघर येथील अधीक्षक सुधाकर कदम यांची नांदेड येथे, नाशिक येथील शशिकांत गर्जे यांची अमरावती,छत्रपती संभाजीनगर येथील संतोष झगडे यांची नाशिक येथे, धाराशिव तेथील गणेश बारगजे यांची पालघर येथे, अमरावती येथील ज्ञानेश्वरी आहेर यांची जालना येथे, वाशिम येथील अभिनव बालुरे यांची छञपती संभाजीनगर येथे, नांदेड येथील अतुल कानडे यांची पुणे येथे तर संजय पाटील यांची वर्धा येथे बदली करण्यात आली आहे. 

ज्ञानेश्वरी आहेर नव्या अधीक्षक

जालना जिल्ह्यात मोठया प्रमाणावर अवैध मद्यविक्री केली जात असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पद रिक्त असल्यामुळे अवैध मद्यविक्री शिगेला पोहोचली आहे. आता अमरावती येथून बदली होऊन ज्ञानेश्वरी आहेर या पूर्णवेळ अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध मद्यविक्रीला लगाम लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

छत्रपती संभाजीनगरची सूत्रे बालुरेंच्या हाती 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छञपती संभाजीनगर जिल्ह्यातून मद्यविक्रीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठा महसूल मिळतो. शिवाय येथे मद्यविक्रीसह मद्याचे उत्पादन देखील केले जाते. तथापि, येथील अधीक्षक संतोष झगडे यांची नाशिकला बदली झाल्यामुळे येथे विदर्भातील वाशिम येथून अभिनव बालुरे अधीक्षक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जिह्यातील अवैध आणि बनावट मद्य निर्मिती आणि विक्रीला आळा घालण्याचे आव्हान बालुरे यांच्यासमोर असेल. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top