dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शिक्षणतज्ज्ञ गुलाम वस्तानवी यांच्या निधनाने शोककळा 

परतूर : शिक्षणतज्ज्ञ तथा धार्मिक विद्वान मौलाना गुलाम वस्तानवी उर्फ मौलाना गुलाम मोहमद वस्तानवी यांचे रविवार,4 में रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र शोककळा पसरली. मौलाना वसतानवी यांनी धार्मिक शिक्षणा सोबतच मुस्लिम विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आधुनिक शिक्षणही द्यावे, यावर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. 

एम. एल. कुरेशी/ परतूर : शिक्षणतज्ज्ञ तथा धार्मिक विद्वान मौलाना गुलाम वस्तानवी उर्फ मौलाना गुलाम मोहमद वस्तानवी यांचे रविवार,4 में रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र शोककळा पसरली. मौलाना वसतानवी यांनी धार्मिक शिक्षणा सोबतच मुस्लिम विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आधुनिक शिक्षणही द्यावे, यावर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. 

जालना जिल्ह्यात बदनापूर येथे त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात त्यांनी अनेक ठिकाणी धार्मिक शिक्षणासह आधुनिक शिक्षणाची दारे मुस्लिम अल्पसंख्यांकांसाठी खुली करून दिली. विगत काही दशकात त्यांनी अक्कलकुआ येथे त्यांनी काही अल्पशा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जामिया इस्लामिया इशातुल उलूम या नावाने आरेबिक मदरसा सुरू केला होता. ते या आरेबिक शाळेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी अक्कलकुआं येथे भारतीय चिकित्सा विज्ञान आणि अनुसंधान संस्थानची (आयआयएमएसआर) स्थापना केली. हे भारतातील पहिले अल्प संख्याक संचालित वैद्यकीय महाविद्यालय ठरले. त्यांना  मानणारा भारतात एक मोठा वर्ग असून त्यांना ‘खादीम-उल-कुराण’ वल-मसाजीद’ अशी  पदवी इस्लामिक विद्वानांनी बहाल करण्यात आली होती. युवा पिढीने सोशल मीडिया व नशापान यापासून दूर रहावे, अशी शिकवण त्यांनी आपल्या अनुयायांना दिली होती. त्यांनी स्थापन केलेल्या बदनापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. 

 शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य

महाराष्ट्रासह देशभरात शिक्षण क्षेत्रात मौलाना वस्तानवी यांनी मोठे भरीव कार्य केले. मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले. शैक्षणिक केंद्र उभे केले. तेथे व्यावसायिक शिक्षण देण्यावर भर दिला. भविष्यात हे केंद्र अल्पसंख्यांक समाजाला एक नवीन दिशा देतील.

धार्मिक प्रचार व प्रसार यातही त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत मौलाना मोहम्मद अली जोहर तथा अल हिलाल एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पठाण आयुब खान यांनी व्यक्त केले.

 समाजाचे मोठे नुकसान

वस्तानवी यांच्या निधनामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले. धार्मिक शिक्षणाला सामाजिक शिक्षणाची जोड त्यांनी दिली होती. त्यांनी आपले कार्य काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत केले.  मशिदींची, मदरशांची उभारणी केली. मुलींच्या शिक्षणावर विशेष भर दिला, असे मत मोहम्मद  बाबर कामी, मुफ्ती अब्दुल कदीर, मौलाना अकील कुरेशी, मुफ्ती  जहिरुलहक फारूकी, माजी उपनगराध्यक्ष कय्यूमखान पठाण, आ.  नारायण कूचे, माजी आमदार सुरेश जेथलिया, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पानवाले आदींनी नमूद केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top