dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कारंजा नगर परिषदेचे अभियंता विजय घुगरे बेपत्ता; मुलाची कारंजा शहर पोलिसात तक्रार 

कारंजा : कारंजा नगर परिषद कार्यालयात कार्यरत बांधकाम अभियंता विजय  घुगरे  बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मुलाने यासंबंधी कारंजा शहर पोलिस स्टेशनमध्ये  २ मे रोजी वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली आहे.  

कारंजा : कारंजा नगर परिषद कार्यालयात कार्यरत बांधकाम अभियंता विजय  घुगरे  बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मुलाने यासंबंधी कारंजा शहर पोलिस स्टेशनमध्ये  २ मे रोजी वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, विजय निवृत्ती घुगरे (५७, रा. लाखाळा वाशिम) हे कारंजा नगर परिषदेत अभियंता पदावर नोकरीवर आहेत.  १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त नगर परिषदेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम असल्याने ते त्यादिवशी सकाळी ६.३० वाजता वाशिम येथून कारंजासाठी रवाना झाले होते. येथे पोचल्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते साधारण १० वाजताच्या सुमारास साईट व्हिजिट करण्याचे कारण सांगून नगर परिषद कार्यालयातून  बाहेर पडले होते. पण त्यानंतर ते ना नगर परिषदेत पोचले ना घरी. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, ते आढळून आले नाहीत. विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल क्रमांक बंद येत आहे. अखेर त्यांचा मुलगा गौरव विजय घुगरे (३०, रा.रा. लाखाळा वाशिम) यांनी कारंजा शहर पोलिसात २ मे रोजी मिसिंगची  फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी   शोधकार्याला सुरुवात केली आहे. अभियंता घुगरे  बेपत्ता झाल्याने शहरात वेगवेगळ्या चर्चेने जोर धरला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोहेका बरडे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top