dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

धक्कादायक! वाशिमात शाखा डाकपालाचा गैरव्यवहार; खासगी कामांसाठी वापरले खातेदारांचे पैसे

अकोला : वाशिम जिल्ह्यातील कारंजा उपडाक घर अंतर्गत येणाऱ्या वाई परगणे शाखेच्या डाकपालाने खातेदारांचे पैसे स्वतःच्या खासगी कामासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर डाकच्या खातेदारांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान खातेदारांनी आपल्या बचत ठेव योजना, रकमा आदीची माहिती कागदपत्रांसह २५ एप्रिलपूर्वी सादर करण्याचे आवाहन प्रवर डाक अधिक्षकांनी केले आहे. 

प्राप्त माहितीनुसार,  कारंजा उपडाकघरअंतर्गत वाई परगणे शाखा आहे. तेथील शाखा डाकपाल संजय शाळिग्राम भुयटे यांनी खातेदारांच्या बचत खाते, आवर्ती जमा, सुकन्या समृद्धी योजना अशा विविध खात्यांतील शासकीय रकमेचा गैरव्यवहार करून ती खासगी कामासाठी वापरल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला. त्याबाबत कारवाई सुरू आहे. दरम्यान, या शाखेच्या खातेदारांनी आपले संबंधित बचत योजनेचे खातेपुस्तक किंवा तत्सम कागदपत्रे २५ एप्रिलपूर्वी सहाय्यक अधीक्षक, वाशिम पश्चिम उपविभाग, मूर्तिजापूर यांच्याकडे तपासणीसाठी सादर करावीत. जे खातेदार मुदतीत आपले पुस्तक तपासणीला सादर करणार नाहीत, त्यांचा कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही, असे आवाहन प्रवर अधिक्षकांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top