Buldhana vote counting: विधानसभा मतदारसंघाची लढत अतिशय चुरशीची होत असून, महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, यामध्ये बदलत्या फेरीनुसार मतदान कमी जास्त प्रमाणात दिसत आहे. बाराव्या फेरीत संजय गायकवाड हे १ हजार ६५३ मतांनी आघाडीवर आहेत.
बुलढाणा: विधानसभा मतदारसंघाची लढत अतिशय चुरशीची होत असून, महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, यामध्ये बदलत्या फेरीनुसार मतदान कमी जास्त प्रमाणात दिसत आहे. बाराव्या फेरीत संजय गायकवाड हे १ हजार ६५३ मतांनी आघाडीवर आहेत.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढतीत मतमोजणी पासून महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड आघाडीवर राहिले आहेत. मात्र, निम्म्याहून अधिक फेऱ्यांची गणना बाकी असल्याने अजूनही मतदार संघात संभ्रम कायम आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात खऱ्या अर्थाने काटे की टक्कर पाहायला मिळते आहे.