Buldhana vote counting: जिल्ह्यातल्या सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे. सकाळी 8:00 वाजेपासून सुरू झालेल्या मतमोजणी मध्ये सात पैकी सहा जागांवर महायुतीचेच उमेदवार पुढे आहेत.
बुलढाणा : जिल्ह्यातल्या सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे. सकाळी 8:00 वाजेपासून सुरू झालेल्या मतमोजणी मध्ये सात पैकी सहा जागांवर महायुतीचेच उमेदवार पुढे आहेत. मलकापुरात चैनसुख संचेती एकतर्फी विजयाकडे वाटचाल करीत आहेत. खामगाव मध्ये आकाश फुंडकर ५००० पेक्षा अधिक मतांनी पुढे आहेत. जळगाव जामोद मध्ये संजय कुटे पुढे आहेत. मेहकर मध्ये संजय रायमुलकर एकतर्फी विजयाकडे वाटचाल करीत आहेत. चिखली मध्ये भाजपच्या श्वेता ताई महाले पाटील सुरुवातीच्या पाचही फेऱ्यांमध्ये तीन हजारापेक्षा अधिक मतांनी पुढे आहेत. बुलढाण्यात संजय गायकवाड ९ फेऱ्यांच्या मतमोजणी अंति ३०१७ मतांनी पुढे आहेत. सिंदखेडराजात डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या चढाओढ सुरू आहे, मनोज कांयदे सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.डॉ.शिंगणे सात फेऱ्यानंतर ३००० पेक्षा अधिक मतांनी पुढे आहेत.