Buldhana vote counting: जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात भाजपचे नेते महायुतीचे उमेदवार डॉ. संजय कुटे यांनी ७ हजार २९९ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस, महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वाती वाकेकर पिछाडीवर आहेत.
बुलढाणा: जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात भाजपचे नेते महायुतीचे उमेदवार डॉ. संजय कुटे यांनी ७ हजार २९९ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस, महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वाती वाकेकर पिछाडीवर आहेत.
जळगाव जामोद मतदारसंघात प्रामुख्याने दुरंगी लढत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत असून, अपक्ष उमेदवारांमुळे होणारे मत विभाजन महायुतीसाठी तारक ठरत असल्याचे सद्यस्थितीत चित्र आहे. जळगाव जामोद मतदारसंघातील दिसून येत असलेल्या लढतीत महायुतीमध्ये उत्साह असून, कार्यकर्ते आतापासूनच जल्लोष साजरा करताना दिसून येत आहेत. मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये मताधिक्य खोडून काढण्यास आघाडीला यश मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.