dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Buldhana vote counting: बुलढाणा मतमोजणी : टपाली मतमोजणीला सुरुवात! महायुती शिंदे सेनेचे उमेदवार संजय गायकवाड आघाडीवर

Buldhana vote counting: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, प्रथमतः सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये बुलढाणा विधानसभेत महायुतीचे संजय गायकवाड ३०९ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Buldhana vote counting

बुलढाणा: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, प्रथमतः सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये बुलढाणा विधानसभेत महायुतीचे संजय गायकवाड ३०९ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नऊ टेबल वरून पोस्टल मते मोज ली जात आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी 14 टेबल याप्रकारे एकूण 98 टेबल वरून जिल्ह्यातील सात मतदारसंघाची मतमोजणी होत आहे.

मतदारांच्या संख्येनुसार फेऱ्या होणार आहेत. मलकापूरमध्ये २२, बुलढाण्यात २४, चिखलीमध्ये २३, सिंदखेड राजात २५, मेहकरमध्ये २५, खामगावात २३. जळगाव जामोदमध्ये २३ याप्रमाणे मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. प्रथम टपाली मतांची मोजणी होत आहे. मतदानाचा दिवस असल्याने राजकीय पक्षांसह तमाम मतदारांमध्ये उत्सुकता आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत होत असून, महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्यात मुख्य लढत होत आहे. दरम्यान, आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, प्रथमतः टपाली मतदानाची मोजणी होत आहे. यामध्ये महायुती शिंदे शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड आघाडीवर असल्याचे पाहायला मिळतेय. तर महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top