Fire at BKC Metro station in Mumbai :मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग;  काही तासानंतर मेट्रो सेवा सुरळीत

Fire at BKC Metro station in Mumbai

Fire at BKC Metro station in Mumbai : मुंबईतील बीकेसी भूमिगत मेट्रो स्टेशनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे धुराचे लोळ उठल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

Fire at BKC Metro station in Mumbai

मुंबई : मुंबईतील बीकेसी भूमिगत मेट्रो स्टेशनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे धुराचे लोळ उठल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही. दरम्यान मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र काही तासांनीतर मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती बीकेसी मेट्रोतर्फे देण्यात आली आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनचे काम सुरू असलेल्या परिसरात आज दुपारी १ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास आग लागली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कशी लागली आग ?

भूमिगत मेट्रो स्थानकातील तळघरात असलेल्या लाकडी साहित्य आणि फर्निचर ठेवलेल्या ठिकाणी ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत असून सर्वच प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »