Assembly Elections 2024: मतदान ओळखपत्र नाही, तर हे १२ पुराव्यांच्या आधारे बजावता येणार मताधिकार

Assembly Elections 2024

Assembly Elections 2024: मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. तथापि, मतदान ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले ओळखीच्या १२ पुराव्यांपैकी कोणतेही एक सादर केले तरी मतदान करता येणार आहे.

Assembly Elections 2024

अकोला : मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. तथापि, मतदान ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले ओळखीच्या १२ पुराव्यांपैकी कोणतेही एक सादर केले तरी मतदान करता येणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी मतदान ओळखपत्र नसल्यास अन्य पर्यायांचा वापर करता येणार आहे. जे मतदार आपले मतदान ओळखपत्र दाखवू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी पर्यायी पुरावे म्हणून १२ कागदपत्रांचा ओळखीचा पुरावा म्हणून वापर करता येईल. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. यापैकी कोणतेही एक कागदपत्र मतदार आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावर सादर करू शकतील, असे जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी कळविले आहे.

ही कागदपत्रे ठरणार ग्राह्य

आधार कार्ड, मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड), बँक / टपाल कार्यालयाने दिलेले  छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालन परवाना, स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड,

भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र सरकार / राज्य शासन / सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद सदस्य/ विधानसभा सदस्य/ विधानपरिषद सदस्य यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र (यूडीआयडी), आदी कागदपत्रांचा पर्याय म्हणून वापर करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »