Buldhana Crime News: मेहकर परिसरात गांजा वाहतूक करणाऱ्यास पकडले!

Buldhana Crime News

Buldhana Crime News : प्रतिबंधित असलेल्या गांजा पिकाची लागवड तुरीच्या शेतात करण्यात आल्याचा प्रकार गत महिन्यातच उघडकीस आला होता. इतकेच नाही तर यावर्षी गांजा लागवडीच्या अनेक घटना समोर आल्या. यावर कळस म्हणजे पुनः हा गांजाची वाहतूक झाल्याचे उघडकीस आले आहे. 26 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपिस अटक करण्यात आली.

Buldhana Crime News

बुलढाणा :  प्रतिबंधित असलेल्या गांजा पिकाची लागवड तुरीच्या शेतात करण्यात आल्याचा प्रकार गत महिन्यातच उघडकीस आला होता. इतकेच नाही तर यावर्षी गांजा लागवडीच्या अनेक घटना समोर आल्या. यावर कळस म्हणजे पुनः हा गांजाची वाहतूक झाल्याचे उघडकीस आले आहे. 26 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपिस अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून 6 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेहकर परिसरातील चोपडे ले आउट भागात ही कारवाई करण्यात आली.
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततेत, भयविरहित व निपक्षपणे पार पडावी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टीकून राहण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने कारवाईचे सत्र सुरू आहे. यामध्येच गांजा व इतर अमलीपदार्थ साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर अंमली औषधीद्रवे व मनप्रभावी पदार्थ अधिनियम कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिले. यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र्य पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने 26 ऑक्टोबर रोजी मेहकर परिसरात छापा टाकला असता एक इसम चोरी केलेल्या गांजाची वाहतूक करत असल्याचे दिसून आले. गणेश किशोर दिक्षित (24 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी डोणगांव येथील रहिवासी असून, चारचाकी वाहनात 11 किलो गांजा वाहतूक करताना तो आढळून आला. त्याच्याकडील चारचाकी वाहन, 11 किलो 600 ग्राम गांजा असा एकूण 6 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी गणेश दिक्षित याच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

यांनी केली  कारवाई

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रभारी अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चेचरे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, सचिन कानडे, पोलीस हेड कॉंस्टेबल शरदचंद्र गिरी, एजाज खान, पुरुषोत्तम आघाव, पोलीस नायक विजय वारुळे, गणेश पाटील, पोलीस हवालदार विक्रांत इंगळे, दिपक वायाळ, मंगेश सनगाळे, चालक हवालदार शिवानंद मुंढे, राहूल बोर्ड, राजू आडवे, तांत्रिक विश्लेषण विभागातील ऋषीकेश खंडेराव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »