Buldhana Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून संजय गायकवाड आणि मेहकर मतदार संघातून संजय रायमुलकर यांच्या नावाचा समावेश आहे.
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून संजय गायकवाड आणि मेहकर मतदार संघातून संजय रायमुलकर यांच्या नावाचा समावेश आहे.
महायुतीच्या नेत्यांमध्ये अजूनही चर्चा सुरु आहे. असं असलं तरी तीनही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडूनही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
अखेर शिवसेनेकडे उमेदवारांची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत उमेदवारांची यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.