Chhatrapati Sambhajinagar News : शहरातील नारळीबाग परिसरातील पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या कंपनी कामगारांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसला अचानकपणे आग लागून बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील नारळीबाग परिसरातील पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या कंपनी कामगारांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसला अचानकपणे आग लागून बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
नारळीबाग परिसरातील खुल्या मैदानात सवेरा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बसचे पार्कींग आहे. मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या एका बसला अचानकपणे आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण करीत बसला आपल्या कावेत घेतले होते. आगीचे लोळ दुरवरुनच दिसत होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर सिटीचौक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. पार्कीगमध्ये डिझेल आणि ऑईलची वाहतूक करणारे टँकरही उभे होते. परंतु सुदैवाने आग तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. दरम्यान, सध्या प्रचंड उकाडा जाणवत असल्याने पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या बसच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्कीट होवून आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे. बसला लागलेली आग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी उसळली होती.