Buldhana news: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सोयाबीन, मका, तूर व भाजीपाला पीकाचे आतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून स्थळ निरिक्षण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे. मात्र, परिसरात झालेल्या ‘कोसळधार’ पावसाने शेत रस्त्याची पुरती वाट लावल्याने शेतात स्थळ निरिक्षण करण्यासाठी कसे, जावे असा पेंच अधिकाऱ्यासमोर उभा ठाकला, असता त्यानी चक्क बैलगाडीचा सहारा घेत नुकसानीचे स्थळ निरिक्षण केले.
अंढेरा (जि. बुलढाणा) : मागील तीन दिवसापूर्वी अंढेरा मंडळात परतीच्या पावसाने थैमान घातले होते. याच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सोयाबीन, मका, तूर व भाजीपाला पीकाचे आतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून स्थळ निरिक्षण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे. मात्र, परिसरात झालेल्या ‘कोसळधार’ पावसाने शेत रस्त्याची पुरती वाट लावल्याने शेतात स्थळ निरिक्षण करण्यासाठी कसे, जावे असा पेंच अधिकाऱ्यासमोर उभा ठाकला, असता त्यानी चक्क बैलगाडीचा सहारा घेत नुकसानीचे स्थळ निरिक्षण केले.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने सर्वत्र हाहा:कार उडाला. अनेक तालुक्यात या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मका, तुर यासह भाजीपाला पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शासकीय स्तरावरुन हालचालीना वेग आला असून त्यानुसार स्थानिक पातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीचे स्थळ निरिक्षण करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अंढेरा मंडळात झालेल्या नुकसानीचे स्थळ निरीक्षण व पंचनामे करण्याच्या निर्देश देऊळगाव राजा तहसिलदार यांनी नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले. अंढेरा मंडळात देखील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्थळ निरिक्षण करण्यासाठी देऊळगाव राजा नायब तहसिलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी केदार हे अंढेरा मंडळातील एका गावात पोहचले असता शेतरस्त्याने जाणे शक्य नसल्याने त्यांनी स्थळ निरिक्षण व पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर तर जावे, लागेल. या भावनेतून चक्क शेतकऱ्यांच्या बैलगाडीचा सहारा घेत पीक नुकसानीचे स्थळ निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत गरकळ, खांडेभराड यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.