Electricity consumers  accepted ‘Go-Green’ : वऱ्हाडातील २८ हजारापेक्षा जास्त वीज ग्राहकांनी स्विकारले ‘गो-ग्रीन’ 

Electricity consumers  accepted 'Go-Green'

Electricity consumers  accepted ‘Go-Green’ : पश्चिम वऱ्हाडातील २८ हजार ४२३ वीज ग्राहकांनी छापील वीजबिल नाकारत कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो – ग्रीन सेवेचा लाभ घेतल्याने त्यांना वर्षाकाठी ३४ लाख १० हजार ७६० रूपयाची बचत होते.

Electricity consumers  accepted 'Go-Green'

बुलढाणा : पश्चिम वऱ्हाडातील २८ हजार ४२३ वीज ग्राहकांनी छापील वीजबिल नाकारत कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो – ग्रीन सेवेचा लाभ घेतल्याने त्यांना वर्षाकाठी ३४ लाख १० हजार ७६० रूपयाची बचत होते. वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रत्येक वीजबिलामागे दर महीन्याला १० आणि वर्षाला १२० रूपयाची सूट देण्यात येते.
महावितरणने ग्राहकांसाठी पर्यावरणपूरक “गो ग्रीन” योजना सुरू केली आहे, ज्याचा उद्देश कागदाचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करणे आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणे आहे. या योजनेअंतर्गत महावितरण ग्राहकांना त्यांचे वीजबिल ईमेलद्वारे मिळते. ज्यामुळे कागदी बिलांचा वापर टाळता येतो. या योजनेमुळे झाडे वाचवण्यास मदत होते. कारण प्रत्येक महिन्यात लाखो कागदी बिले पाठवण्याची गरज कमी होते. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमधून बिलासाठी कागदाचा वापर बंद केला तरी वीज बिलाची दरमहा प्रत संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय उपलब्ध आहे.

सर्वाधिक गो-ग्रीन अमरावती जिल्ह्यात

पश्चिम विदर्भात गो-ग्रीन झालेले सर्वाधिक ग्राहक अमरावती जिल्ह्यात आहेत. सद्यस्थितीत पश्चिम वऱ्हाडाअंतर्गत २८ हजार ४२३ वीज ग्राहकांनी छापील वीजबिल नाकारले आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात ८ हजार ३८, यवतमाळ ५ हजार ३५३, अकोला ५ हजार ७४३, बुलढाणा ६,७९५ आणि वाशीम जिल्ह्यात २ हजार ४९४ ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »